रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या जोरदार पावसांच्या सरीमुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची धावपळ उडाली. वाहनधारकांनी तसेच नागरिकांनी आडोशाचा आधार घेतला.
अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे हवामान खात्याने अवकाळी ची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर वाहनांची गती यामुळे कमी झाल्याचे चित्र देखील दिसून आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली