लिंबोटा येथील दिवटे हे आमच्या कुटूंबातील सदस्यासारखे, आ.धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची भेट घेत केली प्रकृतीची चौकशी
दिवटे आमच्या कुटूंबातील सदस्यासारखा आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला तसेच पोलिस अधिक्षकांनी देखील स्टेटमेंट दिले आहे. की या प्रकरणात जातीपातीचे कारण नाही... आता या सर्व प्रकरणाचा तपास पोलिस नक्की करतील असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात शिवराज दिवटे याची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच त्याच्या वडीलांशी देखील संवाद साधला.
शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात पंधरा ते वीस जणांनी मारहाण केली होती. यात तो जखमी झालेला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली