LOKSANDESH NEWS
बदनापूर तालुक्यात बाजार वाहेगाव येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्यात काल दिनांक 27 मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथे जोरदार वादळी वाऱ्यास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे बाजार वाहेगाव येथे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने या सर्व नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत करावी, अशी मागणी बाजार वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.