पन्हाळा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे, नाले आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळेच नदीकाठच्या शेतामध्ये ही पाणी शिरू लागले आहे. तर पडत असलेल्या दमदार पावसामुळे नदीकाठच्या जमिनीचे भूस्खलन होत आहे.
पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीच्या काठावर माजनाळ आणि कोलोली ही गावे आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर या माजनाळ आणि कोलोली गावातील नदीकाठच्या जमिनीचे भूस्खलन झाले आहे. यामध्ये काठावर असणाऱ्या कोलोली येथील 7 तर माजनाळ येथील 11 जणांच्या विद्युत मोटारी नदीत वाहून गेल्या आहेत. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.