येत्या तीन महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार - किरीट सोमय्या
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आणि मुंबईचे पोलीस महासंचालक यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटविण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः 50 पोलीस स्टेशनला जाऊन आलो आहे, मुंबई मध्ये एका महिन्यात सर्व मशिदीवरील भोंगे खाली येतील यासह तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र भोंगे लाऊडस्पीकर मुक्त होणार, जे मुंबई उच्च नायलयाने निर्णय दिला आहे
त्याचे पालन होणार असून काही माफिया धर्माच्या नावावर मशिदीवर दिवसातून 5 वेळा भोंगे वाजवत होते, त्याची परवानगी कोणालाही नसल्याचे भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या हे वाशिम येथे आले असता माध्यमांशी बोलत होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./