अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करण्यासाठी गोरंट्याल यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. किशोर पाटील हा मागच्या अनेक वर्षांपासून खोतकरांसोबत काम करत आहे. धुळे विश्रामगृहावर पावने दोन कोटी रुपये सापडले.
त्यामुळे किशोर पाटील यांनी अतापर्यंत किती पैसे गोळा करून खोतकरांना दिले? हे समोर यायला हवं. यासाठी किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे. यासह खोतकर यांचे सदस्यत्व रद्द करून स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी गोरंट्याल यांनी करत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./