जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक महिलेचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, पाझर तलावात संपादित न झालेली जमिन पूर्ववत नावे करण्याची मागणी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक महिलेचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, पाझर तलावात संपादित न झालेली जमिन पूर्ववत नावे करण्याची मागणी



जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक महिलेचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, पाझर तलावात संपादित न झालेली जमिन पूर्ववत नावे करण्याची मागणी 

   जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका आंदोलक महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. रोहिणी मिरकूट असं या महिलेचं नाव असून, ती जालना तालुक्यातील उटवद येथील रहिवासी आहे. मिरकूट यांची हिवरा रोषणगाव गट क्रमांक 105 मधील 4 एकर जमीन पाझर तलावात संपादित झालेली आहे. 

   मात्र, रेकॉर्डवर 8 एकर दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरित चार एकर जमीन पूर्ववत आमच्या नावे करून देण्यात यावी, यासाठी रोहिणी यांचे पती मागच्या 20 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने रोहिणी मिरकूट यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. दरम्यान यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत महिलेला रोखल्याने अनर्थ टळला. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल घटनास्थळी दाखल झाले. 


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./