LOKSANDESH NEWS
मान्सूनपूर्व पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना फटका
मान्सून पूर्व पावसाचा बीड जिल्ह्यात पिकांना फटका बसलाय. बीड तालुक्यातील चाकरवाडी परिसरात काढणीला आलेले पपई, टरबूज, कांदा पिकासह बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. चाकरवाडी येथील लखन वरपे या शेतकऱ्याने दोन एकरवर टरबुजाची लागवड केली होती.
मात्र, सततच्या पावसानं पिकांचे नुकसान झाले. वरपे यांनी दोन लाखांचा खर्च करून टरबुजाची लागवड केली होती. त्यातून चार लाखांचे उत्पन्न मिळणार होते. परंतु, तत्पूर्वीच या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली