LOKSANDESH NEWS
सांगलीच्या इस्लामपूर मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी मुसळधार पाऊस
वाळवा व शिराळा तालुक्यातील या अवकाळी पावसामुळे खरीप पूर्व शेतीच्या मशागतीचे कामे रखडली असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. तसेच शिराळा तालुक्यातील वाळल्या मशागतीमध्ये भाताची पेरणी केली जाते या अवकाळी पावसामुळे त्याही पेरण्या खोळंबल्या आहेत.
रोहिणी नक्षत्र जवळ आल्याने या शिराळा तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीची मशागती मध्ये व्यस्त होता. वाळल्या घातीमध्ये भाताची पेरणी करत होता. या अवकाळी पावसामुळे सलग आज दुसऱ्या दिवशी पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली