भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंम्बींग ऑपरेशन
सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था तसेच अतिरिक्त सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त, रिजन सिपी आणि पोलिस उपायुक्ताच्या यांच्या आदेशानुसार रात्री ११ ते १ वाजताच्या दरम्यान कोंम्बींग आ’परेशन राबविले गेले. या दरम्यान ४७ पोलिस अधिकारी आणि २०९ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.
आर्म अ’क्टनुसार तीन , अवैध्य धंद्यावर नऊ, ,दारु विक्री बंदीबाबत नऊ, तंबाकूजन्य पदार्थ २६, प्रतिबंधक अंमली पदार्थ सेवन ७ कारवाया करुन २५ गुन्हे दाखल करण्यात आले. हिस्ट्री सिटर, गुंड यांना हद्दभार इसम यांना चेक करण्यात आले. २७६ वाहने तपासण्यात आली. ६६ वाहनांवर कारवाई करुन ७८ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. देशविघातक कृत्य करणाऱ्या संशयितांच्या विरोधातही कारवाई सुरु असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली