सांगली जिल्ह्यामध्ये किती डॉक्टर पात्र आहेत व किती डॉक्टर शासन नियमानुसार अयोग्य आहेत याची तपासणी होणे गरजेचे आहे . - सुनील साबळे
आज दिनांक 22 मे 2025 रोजी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन यांच्या अंतर्गत आय.एच .एम. ओ. मीडिया फेडरेशन महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. सुनील विष्णू साबळे सर व सांगली जिल्हा अध्यक्ष मा. रतनजी तोडकर सर यांच्या वतीने, सांगली जिल्ह्यामध्ये सध्या चालू असलेल्या बोगस डॉक्टरांची तपासणी करून व त्यांच्या मार्फत लॅब सेंटरची जादा पैसे आकारणी करून जी साखळी चालू आहे, या सर्व गोष्टींची चौकशी करून, दोषी व्यक्तींच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. कारण सांगली जिल्ह्यामध्ये किती डॉक्टर पात्र आहेत व किती डॉक्टर शासन नियमानुसार अयोग्य आहेत याची तपासणी होणे गरजेचे आहे. कारण चुकीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मानवांचे जीवन धोक्यात आले आहे तसेच लॅब सेंटरमध्ये नको ते दर लावून जनतेकडून तपासणीसाठी जादा पैसे उकळताना दिसत आहेत.
काही ठिकाणी रक्त, लघवी, एक्स-रे, एम आर व सोनोग्राफी यांच्यासाठी तर जगापेक्षा जास्त रेट आहेत.जनतेला हे लॅब सेंटर लोक बिनधास्त लुटत आहेत.हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी मा. अशोक जी काकडे साहेब यांना निवेदन सादर केले आणि मागणी केली आहे की, ताबडतोब बोगस डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करावी व अतिरिक्त व लोकांना फसवून जास्त पैसे घेणाऱ्या सेंटरवर अचानक भेटी देऊन तपासणी करून, यांच्यावर थेट कारवाई करण्यात यावी. आपण जनतेसाठी एवढे कार्य कराल हीच अपेक्षा. हे निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांच्यावतीने आर डी सी साहेब यांनी स्वीकारले. यावेळी महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व सांगली जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.