LOKSANDESH NEWS
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात पाचशे हेक्टरवरील कांदा, भुईमुंग, मका केळी, यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान
गेल्या बारा ते पंधरा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामध्ये अंगावर वीज पडल्याने तीन जणांचा मृत्यू झालाय तर पाच जनावरेही दगावली आहेत,
त्याचबरोबर उन्हाळी पिकांच मोठ नुकसान झाल आहे, कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील पाचशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रफळावरील कांदा, भुईमुंग, मका, केळी, भाजीपाला यासह इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. तर झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली