चोपड्यात संशयितरित्या वाहतूक होणारा गांजा पोलिसांनी पकडला, मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चोपड्यात संशयितरित्या वाहतूक होणारा गांजा पोलिसांनी पकडला, मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत

चोपड्यात संशयितरित्या वाहतूक होणारा गांजा पोलिसांनी पकडला, मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत 

 चोपडा शिरपूर रस्त्यावरील गलंगी गावाजवळ दोन इसम मोटरसायकलीवरुन संशयीरित्या येत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि त्या ठिकाणी मोटरसायकल वरील इसमांना थांबवून त्यांच्या जवळ असलेल्या गोणींची तपासणी केली असता त्यामध्ये सात किलो 855 ग्रॅम गांजा आढळून आला, 

त्याची किंमत एक लाख 72 हजार 810 व मोटरसायकल 75 हजार असा एकूण दोन लाख 48 हजार 810 रुपयाचा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना ताब्यात घेण्यात आले असून सदर गांजा कुठून कुठे घेऊन जाणार होते यासंदर्भात तपास करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.