हापूसची आवक संपली आता जुन्नरच्या शिवनेरी आंब्याची आवक सुरु
नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आता कोकणातील हापूस आंब्याची आवक संपली असली तरी या आंब्यांची जागा आता जुन्नर मधील शिवनेरी आंबा आणि कर्नाटक मधील आंब्याने घेतली आहे. रोज 10 ते 12 हजार जुन्नर आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल होत असून, 2 ते 3 डझनची पेटी 400 ते 800 रुपयांपर्यंत आहे. जुन्नरचा आंबा हा कोकणातील हापूस आंब्यापेक्षा चवीला गोड असल्याने जुन्नर आंब्याला देखील बाजारात मोठी मागणी आहे.
तर कर्नाटक आंब्याला 50 ते 70 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय. आणखी दोन ते तीन आठवडे हा आंब्याचा सीजन चालणार असून, त्यानंतर आंब्याचा सीजन बंद होईल. त्यामुळे आंबे खवय्यांनी या हंगामातील आंब्याची चव चाखावी, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.