इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी प्रारंभ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी प्रारंभ



                                               इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी प्रारंभ

बुलढाणा जिल्ह्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यंदा एकंदरीत 42,390 प्रवेश क्षमतेच्या तुलनेत केवळ 38 हजार 996 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. दोन दिवस विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सरावासाठी देण्यात आली होती त्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. शिक्षण विभागाने यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीची पहिली प्रक्रिया पार पडली आहे. 

जिल्ह्यातील 344 कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण विभागाने तयार केलेल्या पोर्टलवर नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांमध्ये 42 हजार 390 जागा प्रवेशासाठी मिळणार आहेत. मात्र, यंदा जिल्ह्यात 37हजार 555 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे जवळपास 5 हजारांवर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा कल यंदाही विज्ञान शाखेकडे अधिक राहणार असल्याचे चित्र आहे. परिणामी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडणार आहे. तर आज दुपारी तीन वाजेपासून वेळापत्रक जाहीर झाले असून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी केले आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली