LOKSANDESH NEWS
दहावी बोर्डाचा निकाल जाहीर ; पुन्हा एकदा मुलींचीच बाजी, अमरावती विभागाचा ९२.९५ टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९२.९५ टक्के लागला आहे.
नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९५.५८ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात पाचव्या स्थानी होता. यावेळी क्रमवारीत सहाव्या स्थानी घसरण झाली असून निकालात २.६३ टक्क्यांची घट झाली आहे.
अमरावती विभागातून एकूण १ लाख ६० हजार ६६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षेला १ लाख ५८ हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अमरावती विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९२.९५ आहे. तसेच यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण जिल्ह्यात ,राज्यात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. दहावी उत्तीर्ण तसेच एटीकेटी धारक विद्यार्थीही ऑनलाइन अर्ज करू शकतो. तसेच संबंधित सर्व कनिष्ठ महाविद्यालय, हायस्कूल यांना शाळा रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.