LOKSANDESH NEWS
सांगलीतील थरारक घटना, किरकोळ वादातून गुंडाचा पाठलाग करून हत्या
मुबारक असिउल्ला शाहआर्म अॅक्टसारखे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारक असिउल्ला शाह (वय ४२, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर) याचा सहा जणांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने आणि दगडाने ठेचून निघृण खून केला. मंगळवार बाजार चौक ते नुमराह मशीदसमोर हे थरारनाट्य घडले. हल्ल्यानंतर सहा जण दोन दुचाकींवरून पसार झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार चित्रित झाला आहे. प्राथमिक तपासात किरकोळ वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत मुबारक शाह याचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. बऱ्याच वर्षांपासून ते सांगलीत राहतात. मुबारक हा प्रकाशनगर येथे पत्नीसह राहत होता. त्याला एक मुलगी आहे. मुबारक पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनी हल्ला, आर्म अॅक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलीकडे तो 'स्क्रॅप' चा व्यवसाय करीत होता. सोमवारी दुपारी आले. मुबारक आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून एकाने धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला.
मंगळवार बाजाराजवळील छावा चौकात मुबारक शाह आणि त्याचा मित्र अझरुद्दीन हे दोघे जण मावा खाण्यास आले होते. तेव्हा पाठलागावर असलेले सहा हल्लेखोर तेथे आले. वादानंतर धारदार शस्त्राने मुबारकवर वार करताच तो पळाला. परंतु, हल्लेखोरांनी नुमराह मशीदसमोर रस्त्याच्या पलीकडे कॉलनीत त्याला गाठून हल्ला चढवला.
खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण स्वामी यांनी पथकासह धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे आणि पथकही तत्काळ दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या. घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.