LOKSANDESH NEWS
बुलढाण्यात छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जय्यत तयारी;बुलढाणा शहर झाले भगवेमय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 368 व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात धर्मवीर आखाड्याच्या माध्यमातून 12 मे 14 मे रोजी विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यन्त लढणाऱ्या या पराक्रमी शिवपुत्राची जयंती बुलढाण्यात गेल्या 30 ते 35वर्षांपासून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे साजरी करत असतात.
यावर्षीचा हा लोकोत्सव अधिक भव्यदिव्य, अधिक तेजस्वी आणि ऐतिहासिक ठरणार आहे. बुलढाणा शहरात भगवे झेंडे व पताका लावून संपूर्ण शहर भव्यमय झाले असून शहरातील जयस्तंभ चौकात भव्य लाईट शो आणि आतिश बाजी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.