LOKSANDESH NEWS
विना परवानगी व विनाआय कार्ड नसताना बँकेतून वसुली
विना परवानगी व विनाआय कार्ड नसताना बँकेतून वसुली केली जाते व फायनान्स वाल्यांच्याकडून देखील वसुली केली जाते. बिलासाठी थकित देणाऱ्या व्यक्तींच्या गाड्या उचलून आणल्या जातात व त्या बदल्यात बाहेरच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर पैसे वसूल केले जातात.या वसुली पथकावर आणि बेकायदेशीरपणे वागणाऱ्या फायनान्स वसुलीवर प्रशासनाने ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करावेत. कारण शासन नियमानुसार यांना कोणत्याही व्यक्तींच्या गाड्या काढून घेता येत नाही व उचलून आणता येत नाही. तसेच त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यासाठी त्यांना नियमानुसार लीगल सल्लागार यांची नोटीस व त्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड कायदेशीरपणे असणे गरजेचे आहे.तसेच हे वसुली पथकांना ट्रेनिंग देखील गरज आहे.
परंतु हे बेकायदेशीरपणे वागणारे वसूली पथक फायनान्स ची नावे सांगून व बँकांची नावे सांगून त्यासाठी दमदाटी करून गाड्या उचलून आणल्या जातात व त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जातात.त्यासाठी मा. मंत्री महोदय यांनी सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांना व त्यांच्या मार्फत ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे ऑफिस आहे, त्यांना आदेश द्यावा की ज्या ठिकाणी गाड्या उचलून नेतात व त्यांच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीर लावले जातात, त्या ठिकाणांची तपासणी स्वतः करावी व इतक्या गाड्या कोठून आणल्या आहेत, त्याची तपासणी करावी. त्यामुळे आपणास वरील सर्व घोटाळा व बेकायदेशीर कृती पाहण्यास मिळेल. या व्यक्तींच्या मुळे व वसुलीमुळे आणि दहशतीमुळे जनता कंटाळलेली आहे.जनतेवर अन्याय होताना दिसत आहे. त्यामुळे अशा बँकांवर आणि फायनान्स बँकांवर देखील तपासणी करून कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करावी व हे बेकायदेशीरपणे वागणाऱ्या वसुली पथकावर त्वरित कारवाई करून हा अन्याय थांबवण्यासाठी मंत्रिमहोदयांनी प्रयत्न करावा. आमची दखल द्याल हीच आशा.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./