जलालपूर भागात तरुणाला टोळक्याकडून मारहाण झालेल्या प्रकरणात गुन्हा दाखल, सात जणांना अटक
बीडच्या परळीतील जलालपूर भागात तरुणाला टोळक्याकडून झालेल्या मारहाण प्रकरणात परळी पोलीस ठाण्यात दहाहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जलालपूर येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान दोन गटात हाणामारी झाली होती. याचाच राग मनात धरून शिवराज नारायण दिवटे याचे दहा ते बारा युवकांनी अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेत जबर मारहाण केली. 10 ते 12 जणांच्या टोळक्याला शिवराज दिवटे न मारण्याची याचना करत विव्हळत असताना देखील त्याला काठी बेल्ट आणि इतर हत्यारांन मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. दरम्यान याची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेत रात्रीतून हा गुन्हा दाखल केला आहे. यातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली