कोल्हापुरात भाजपच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात भाजपच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन


                                   कोल्हापुरात भाजपच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन


 काश्मीर येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने सडेतोड प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवत पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्याच्या या कामगिरीचे कौतुक अवघ्या देशभरात होत आहे. त्यामुळेचं भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

 याच अनुषंगाने कोल्हापुरातही भाजपाच्या पुढाकारातून भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. कोल्हापुरातील दसरा चौक येथून सुरू झालेली ही तिरंगा पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा- बिंदू चौक-शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात येऊन विसर्जित झाली. या पदयात्रेमध्ये हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देत खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर सहभागी झाले होते.



  लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली