पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना; किरकोळ वादातून एकाचा खून
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आलाय. सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या 36 वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा राहणारा आहे. मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे यांच्या सोबत किरकोळ पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता. या वादातच सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकांकडून आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलीय.
या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी एका महिलेला आणि पुरुषाला ताब्यात घेतले असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली