LOKSANDESH NEWS
आदिवासी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी,आदिवासी विकास महामंडळाच्या रब्बी धान खरेदी केंद्रांना सुरुवात
आदिवासी विकास महामंडळ भंडारा रीजनमार्फत रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी एकूण 40 केंद्रांची आखणी करण्यात आली आहे. यापैकी 10 ते 15 केंद्रे सुरू करण्यात आली असून, उर्वरित केंद्रे दोन ते चार दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळ नाशिक संचालक यांनी दिली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसरात 5 केंद्रे तर देवरी तालुक्यात 10 खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच ज्या ठिकाणी गोडाऊनची सुविधा आहे, त्या ठिकाणीही धान खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. महामंडळाच्या सर्व खरेदी केंद्रांवर आवश्यक यंत्रणा सज्ज असून, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. लवकरच सर्व 40 केंद्रे सुरू होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा योग्य दर मिळणार असल्याची माहिती महामंडळचे संचालक यांनी दिली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली