LOKSANDESH NEWS
गडचिरोली आणि गोंदियाच्या पालकमंत्री पदावरून खासदार नामदेव किरसान यांची सरकारवर टीका
गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला बाहेरच्या पालकमंत्री देण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांनी महायुती सरकारवर टीका केली असून जे पालकमंत्री आहेत त्यांना या जिल्ह्यांकडे द्यायला वेळ नाही
त्यामुळे या जिल्ह्याचा विकास होत नाही तसेच गडचिरोली सारख्या छोट्याशा जिल्ह्याला सह पालकमंत्री नेमणे हे काही मला समजलं नाही असेही त्यांनी म्हणाले तर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून त्यांनी इथला पालकमंत्री कोणी वेगळाच आहे अशी अप्रत्यक्षरीत्या खासदार प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली