आरटीओची वसुली मोहीम आमदार, खासदारांच्या निशाण्यावर
ग्रामीण भागातून शेतमाल घेऊन जाणाऱ्या पीकअपसाठी दीड हजार रुपयांचा हप्ता घेतात. हा हप्ता न देणाऱ्या वाहनांमधील इतर त्रुटी काढत जास्तीचा दंड आकारला जातो. तसेच सोलापूर जिल्हा दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते हजारो भाविक देवदर्शनाला सोलापूर जिल्ह्यात येत असतात मात्र पोलिसांकडून गाड्या अडवून त्यांची लूट केली जाते. त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी गाड्या अडवू नये अश्या सूचना आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार अभिजित पाटील यांनी केली.
दरम्यान,वाहनांसाठी आरटीओने केलेले रेट कार्ड, पासची चर्चा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली. आमदारांच्या प्रश्नांची तीव्रता पाहून पालकमंत्री जयकुमार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपकर यांना उत्तर देण्यास उभा केले. शेतकऱ्यांची वाहने अडवू नका, जेवढे सांगितले तेवढंच करा, बाकीचं काढलं तर तुमचा कार्यक्रम होईल, अशी टिप्पणी पालकमंत्री गोरे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी निरभगार यांच्या बद्दल केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली