मंत्री गणेश नाईक यांचे जनता दरबारात रौद्ररूप; सिडको अधिकाऱ्यांना झापले, नोटिसा तात्काळ रद्द करण्याच्या सूचना
मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरू असताना, नवी मुंबईसह अनेक नागरिक आपल्या अडचणी घेणून पोहचले. नवी मुंबईतील तलवली गाव घणसोली मधील नागरिक सिडको मार्फत घरांना आलेल्या नोटिसा घेऊन जनता दरबारात पोहचले.
यावेळी गणेश नाईक यांनी थेट सिडको अधिकाऱ्यांना सर्वांच्या समोरच झापले. आपण कोणत्या अधिकारात यांना नोटीसा काढल्या, तत्काळ नोटिसा मागे घ्या, तुम्हाला समजतं का, असे बोलतांना नाईक यांचे रौद्ररूप पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित नागरिक आणि अधिकारी शांत बसून पाहत राहिले. यावेळी आलेल्या नागरिकांना आपल्या घरांवर कोणतीही कारवाई होणार नाही, झालीच तर गणेश नाईक बसला आहे, असे सांगताच नागरिकांनी समधान व्यक्त केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली