तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राकडून आमरण उपोषण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राकडून आमरण उपोषण

LOKSANDESH  NEWS 





 तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राकडून आमरण उपोषण


खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र महड येथील गणपतीच्या तलावात नगर उथान योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र कोकण विभाग अध्यक्ष रोहिदास मिरकुटे यांनी गणपती तलाव महड येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.

या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीलकुमार बावधनकर, रायगड जिल्हाध्यक्ष संतोष मिरकूटे, सचिव मंदार जोशी, सरचिटणीस गणपत पाटील, खालापूर तालुका कार्याध्यक्ष रामदास पाटील, तसेच संदीप भोपी, रवींद्र भोपी, सुयोग खंडागळे, तेजस पवार उपस्थित होते. तसेच जर न्याय न मिळाल्यास या तलावात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे सर्व पदाधिकारी जल समाधी घेतील असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली