अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कृती समितीतर्फे बँक घोटाळ्याच्या विरोधात धरणे आंदोलन
अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या ठेवीदारांचे आज क्रांती चौकामध्ये बँक घोटाळे करणाऱ्या वर सरकार पोलिस यंत्रणा व प्रशासनाकडून पाठ राखण केली जात आहे त्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. २८ ऑगस्ट २०२३ ला रिझर्व बँकेचे निर्बंध लागल्यामुळे बँक बंद झाली. आज दोन वर्षे होत आले आहेत, अजूनही पैसे न मिळाल्याने दिनचर्या चालवणे कठीण होत असल्याने रस्त्यावर आलो आहे. आमची आयुष्याची कमाई जमा ह्या बँकेत ठेवली आहे. अनेक जणांचे बचत तसेच व्यापारी वर्गाचे चालू खाते या बँकेत आहेत.
अनेक वरिष्ठ नागरिकांनी दररोजचा औषध खर्च सुद्धा भागत नाही, त्यामुळे हे वरिष्ठ नागरिक अहवाल झाले असून, ह्या बँकेच्या दोन्ही शाखा मिळून २६००० खातेदार आहेत. त्यात ७० टक्के वरिष्ठ नागरिक आहेत. रिक्षा चालून कष्ट करून आम्ही एकेक पैसे बँकेमध्ये जमा केले. आणि आज ती बँक बुडाली आहे. आम्हाला आमचा पैसा परत हवा आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. कोणी आमदार खासदार मंत्री सुद्धा आमचे म्हणणे ऐकायला तयार नाही. अशी खंत खातेदारांनी यावेळी व्यक्त केली
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली