LOKSANDESH NEWS
बारामतीत ११५ बुलेटच्या बदललेल्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांची कारवाई
बारामती वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम १९८ चे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. विशेषतः, बुलेट मोटारसायकलींवरील सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे
हे बदल फक्त कायद्याच्या विरोधात नाहीत, तर दिवसभर शहरातील अनेक भागांमध्ये ध्वनी प्रदूषणातही लक्षणीय वाढ करत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बारामती वाहतूक पोलिसांनी संपूर्ण शहर भरात अशा सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
याचाच एक भाग म्हणून आज तब्बल ११५ सायलेन्ससर वर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आलेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली