राजेंद्र हगवणे ज्या फार्महाऊस राहिले त्याचे मालक बंडू फाटक यांची प्रतिक्रिया
वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी सातव्या दिवशी अटक केली. या दोघांना शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. ७ दिवस हे कुठे कुठे फिरले याची माहिती समोर आली आहे.
त्यामध्ये 18 मे ला हे दोघे वडगाव मावळ परिसरातील पवना डॅम परिसरातील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर आता या फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी असं काही कृत्य केलं याची मला माहिती नव्हती असं फाटक यांनी सांगितलं ते नेहमी येतात म्हणून मी जा म्हंटलं अशी त्यांनी सांगितलंय.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./