शिंदखेडा तालुक्यातील बेटावद-मुडावद रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची गावकऱ्यांची मागणी
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद ते मुडावद या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचा आहे. त्यांच्या शिंदखेडा मतदारसंघात रस्त्यांची अशी दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
वर्षभरापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांनी या रस्त्याचे काम केले होते, परंतु आता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर धुळे आणि जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर तापी नदीच्या संगमावर अतिप्राचीन कपिलेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील भाविक दर्शनासाठी येत असतात. रस्त्याची दुरवस्था असल्याने भाविकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संतोष वारुडे, सुभाष देवराम पाटील, अशोक तमखाने यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. "मंत्री जयकुमार रावल यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन तातडीने दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्याची दुरवस्था गंभीर असून, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे," असे गावकऱ्यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली