ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक पदी जितेंद्र डाकी यांची निवड,पदग्रहण संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक पदी जितेंद्र डाकी यांची निवड,पदग्रहण संपन्न

LOKSANDESH  NEWS 



                      ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक पदी जितेंद्र डाकी यांची निवड,पदग्रहण संपन्न

भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सर्वानुमते जितेंद्र डाकी यांची निवड करण्यात आली असून ,शुक्रवारी कोनगाव येथील आठगाव विद्यामंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्ष निरीक्षक तथा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी जितेंद्र डाकी यांच्या निवडीची घोषणा केली.त्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,भाजपा पदाधिकारी राम पाटकर,भरत पाटील,रामनाथ पाटील,अशोक इरनाक,यांसह सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा व विधानसभा या निवडणुका या नेतेमंडळींच्या होत्या येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद नगरपंचायत निवडणुका या  कार्यकर्त्यांच्या आहेत.त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्याची चुणूक दाखवण्याची वेळ आली आहे.त्यामुळे सर्वांनी एकदिलाने मनभेद विसरून नवनियुक्त अध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या पाठीशी एकत्रित ठाम पणे  उभे राहण्याची गरज आहे अशा शुभेच्छा देण्यात आल्या.पक्षाने दिलेल्या जबाबदारी बद्दल पक्ष नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत,पक्ष संघटनेचे काम जबाबदारी समजून प्रामाणिक पणे करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे त्यातून आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत हा निश्चय प्रत्येकाच्या मनात असावा असा विश्वास जितेंद्र डाकी यांनी व्यक्त केला.



 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली