LOKSANDESH NEWS
पांझरा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा; धुळे महापालिकेचा उदासीन कारभार
पांझरा नदीतपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर साठल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जलपर्णी पांझरा नदीतून पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आता सामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. या जलपर्णीमुळे देवपूर भागातील एकवीरा देवी मंदिर परिसरात डासांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
डासांचा प्रादुर्भाव फक्त वैयक्तिक त्रासापुरता न राहता तो संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना राबवणे आणि धुळे मनपा प्रशासनाकडून त्याला पूरक ठोस कृती अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते ललित माळी यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली