देवीचा वार्षिक उत्सवात राज्यमंत्री योगेश कदम यांनी भक्तिभावाने पालखी नाचवली
खेड तालुक्यातील जामगे येथील श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई मंदिर येथे देवीचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात देवीच्या पालखीची शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक पार पडली.
राज्यमंत्री योगेश कदम यांनीही भक्तिभावाने पालखी नाचवत देवीचं दर्शन घेतलं. या धार्मिक आयोजनाने परिसरात भक्ती, संस्कृती आणि एकतेचं दर्शन घडवलं.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली