देवदर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबीयांवर काळाचा घाला
माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे, पवार कुटुंबीय मध्य प्रदेशातील उज्जैन शिऊर येथे देवदर्शनासाठी गेले होते, दर्शन आटपुन परतीच्या प्रवासाला असताना अकोला -खामगांव दरम्यान पवार यांच्या गाडीस अपघात झाला, या भीषण अपघातात देवराव पवार, पत्नी बेबीताई पवार, निकेतन पवार या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चालक संतोष कदम व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत,
अपघात एवढा भीषण होता की, पवार यांची ईरटीका कार अक्षरशः चक्काचूर झाली. निकेतन पवार हे नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोत मध्ये रुजू झाले होते. सुट्टीवर ते गावाकडे आले होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली