बिबवेवाडी पोलिसांची दहशतखोरांवर सिंघम स्टाईल कारवाई
बिबवेवाडी परिसरात शस्त्र हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्याचा पोलिसांनी चोख समाचार घेतला आहे. तब्बल फिल्मी स्टाइल ने पाठलाग करून 20 पेक्षा अधिक जणांना अटक करून त्यांना येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
या कारवाईचं नेतृत्व बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व तपास पथकाचे प्रमुख पीएसआय अशोक येवले यांनी ‘सिंघम स्टाईल’मध्ये केलं. परिसरात दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांनी अक्षरशः ताणून ताणून मारलं आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.या घटनेमुळे बिबवेवाडी परिसरात निर्माण झालेली भीती दूर झाली असून, नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं स्वागत केलं आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.