नीरा डावा कालवा फुटला; नागरिकांच्या घरात पाणी, नागरिकांनी मांडल्या व्यथा
बारामती तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
तर बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक गावातून जाणारा निरा डावा कालवा फुटल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
प्रशासनाच्या वतीने अद्यापही कोणी आले नसल्याची माहिती देताना नागरिकांना अश्रू अनावर झाले.
रात्री घरात पाणी शिरल्यामुळे आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य झोपला नसल्याची भावना देखील नागरिकांनी व्यक्त केली.
प्रशासनाला देखील तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळवून, द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.