राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देतांना चारित्र्य तपासा, गुंड आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रदेश देऊ नका असं वारंवार सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनवर अलीला प्रवेश दिला होता.
यावर टीकाटिपणी सुरू झाल्यानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर अली खान व इतर एका जणांचा पक्ष प्रवेश रद्द केला आहे. माझ्याच्याने चूक झाली मी तो पक्ष प्रवेश रद्द करतोय असं स्पष्टीकरण ही चिखलीकर यांनी दिलं आहे. भारतीय जनता पक्षात गुन्हेगारांना प्रवेश दिल्याचे शंभर पुरावे माझ्याकडे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कानउघाडणी केली पाहिजे, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली