LOKSANDESH NEWS
कुख्यात बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू
कुख्यात बिल्डर सलमान डोलारेकल्याणमधील कुख्यात आणि फरार बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे. तलाठ्याची खोटी सही करुन सातबारा तयार केला असून तो सातबारा बनावट असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली होती.
कल्याणचे तहसील कार्यालयातील तलाठी जे. बी. सुर्यवंशी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सलमान डोलारे याच्या विरोधात आत्तापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली