LOKSANDESH NEWS
चोपडा तालुक्यात बागायत क्षेत्रावर मजुरांच्या साह्याने शेतकऱ्याकडून कापूस लागवड सुरू
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. मे महिना सुरू असला तरी ऊन सावलीचा खेळ सुरू असल्याने व या वर्षी शासनाने कापसाचे बियाणे 15 मे पासून कृषी केंद्रांवर विक्रीला परवानगी दिली आहे. तसेच चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात व काल अवकाळी पाऊस झाल्याने शेतात ओलावा निर्माण झाले आहे
तसेच बागायत क्षेत्र असल्याने ठिबकच्या नळ्या शेतात अंथरूण ठेवले आहे. शासनाने जरी एक जून नंतर कापूस लागवड करण्याचे आव्हान केले असले तरी पुढील येणारा हंगामाला उशीर होऊ नये म्हणून 15 ते 20 मे च्या दरम्यान चोपडा तालुक्यात कापूस लागवडीला प्रारंभ झाला आहे. गेल्या अनेक वर्षांचा विचार केला तर कापूस उत्पादक शेतकऱ्याला लागवडी पासून तर कापूस वेचणी पर्यंत जो खर्च येतो त्यामानाने उत्पन्न येत नाही तसेच कापसाला भाव देखील मिळत नाही त्यामुळे यावर्षी कापूस लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. तर दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजाने कापूस लागवड करावी लागत असल्याचे कापूस उत्पादन शेतकरी सांगत आहे.