रखडलेल्या मानधनाच्या मागणीसाठी आशा वर्करचे धरणे आंदोलन
आशा वर्कर यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन गेल्या अकरा महिन्यापासून रखडले आहे. जून 2024 पासून रखडलेल्या मानधनाचा मुद्दा वेळोवेळी शासनाकडे मांडण्यात आला. पण अद्याप मानधन मिळाले नाहीये. सिटू संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले आहे.
शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे वर्ध्यातील असल्याने त्यांनी या मागणीकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा, वाढीव मानधन देण्यात यावे, आशा प्रवर्तक, गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना शासकीय 6कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेय.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली