कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी कृषी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन
कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे. कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्याने कृषी सहायकांना लॅपटॉप देण्यात यावा. आणि कृषी विभागाच्या आकृती बंदास तात्काळ मंजुरी देण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील 374 कृषी सहायकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालयाच्या परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. तर कृषी सहाय्यकांना ग्रामपातळीवर कामकाजासाठी कृषी मदतीस देण्यात मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 374 कृषी सहाय्यक सहभागी झाले होते. तर मागण्याची सोडवणूक न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात सांगितले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली