मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात शिवाजी नगर भागातून निघाली भव्य तिरंगा रॅली
जम्मु काश्मिर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करुन भारतीय नागरिकांची हत्या केली. याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला चोख उत्तर दिले. पाकिस्तानातील आतंकवाद्यांच्या अनेक केंद्रावर हवाई हल्ले करून १०० च्या वर आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भाजपाच्या तिरंगा वतीने रॅलीला सुरवात करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शहर पोस्टेचे ठाणेदार रामकृष्ण पवार व शिवाजीनगर पोस्टेचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर कामगार मंत्री कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत तसेच सागर फुंडकर यांच्या मार्गदर्शनात तिरंगा रॅलीला सुरूवात झाली. रॅलीत देशप्रेमी नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. व टॉवर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली