पंढरपुरातील शिवाजी चौक ते चौफळा या परिसरात पावसाचे वारंवार पाणी साठल्याने व्यापारी आणि नागरिकांचे अनोखे आंदोलन
पंढरपुरातील शिवाजी चौक ते चौफळा या परिसरात पावसाचे वारंवार पाणी साठते. याबाबत नगरपालिका पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
असा आरोप करत स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास श्रद्धांजली वाहण्याचे अनोखे आंदोलन पंढरपुरात केले आहे. यावेळी पालिका प्रशास्रास श्रद्धांजली वाहताना प्रतिकात्मक टाहो फोडण्याचा अर्थात रडण्याचेही काम स्थानिक नागरिक महिला पुरुष व्यापारी यांनी केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.