LOKSANDESH NEWS
वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे साथीरोगापासून काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ञांचे आव्हान
मे महिन्यात शहराचे तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत दरवर्षी असतो. 3 मे पासून शहरातील तापमानाचा पारा झपाट्याने खाली आला. दररोज तापमान 34, तर कधी 30 अंशापर्यंत असते. दिवसभर ढगाळ वातावरण आहे. अधून-मधून कधीतरी पावसाच्या चार सरी येतात.
हे वातावरण धोकादायक असून, डेंग्यूसाठी अत्यंत पोषक असल्याचे मत मनपा वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केले. सध्या अवकाळी पाऊस सुरू असून, डासांच्या प्रजननाचा काळ सुरू आहे. याकरिता आपल्या घरामध्ये किंवा इतर ठिकाणी पाण्याचे डबके साचु देऊ नये. जेवताना खाताना हात स्वच्छ धुवावे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. असे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघना जोगदंड यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.