LOKSANDESH NEWS
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून कोळंबे कुटुंबियांचे सांत्वन
दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीत पाण्याच्या मोठ्या प्रवाहात वाहून गेल्याने राजेश कोळंबे यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.
या दुर्घटनेची तातडीने दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कोळंबे यांच्या निवासस्थानी आज भेट देवून, कुटुंबियांचे सांत्वन केले. शासनाच्यावतीने चार लाखाच्या मदतीचा धनादेश त्यांनी कुटुंबियांकडे सुपूर्द केला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.