वैष्णवी हगवणे प्रकरणावर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया
वैष्णवी आणि शशांक हगवणेच्या लग्नाच्या कार्यक्रमात लावणी डान्सर गौतमी पाटीलने डान्स केला होता. बैलांच्यासमोर गौतमी नाचली होती. तिचा हे व्हिडीओ तेव्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर गौतमीचा हा डान्सचा व्हिडीओ पुन्हा वायरल होत आहे. गौतमी पाटीलने आज पत्रकारांशी संवाद साधताना वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. वैष्णवीसोबत खूपच चुकीचं झालं, तिला न्याय मिळाला पाहिजे, आणि आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे. असं गौतमी पाटील म्हणाली.
वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील म्हणाली की, 'वैष्णवी हगवणेसोबत जे झालं ते खूपच दुर्दैवी होतं. मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी एकच म्हणेल ज्यांनी ही चूक केली, जो आरोपी आहे, त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे. मी वैष्णवी यांच्या बाजूनेच आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
हगवणेंकडून कार्यक्रमाचे मानधन मिळाले का ? या प्रश्नावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, हगवणे यांच्या कार्यक्रमात मला माझं संपूर्ण मानधन मिळाले. कार्यक्रम छान झाला. सगळं व्यवस्थित झालं. व्हिडीओ आता परत व्हायरल झाला. मला काही गोष्ट माहिती नव्हती. मी जसं व्हिडीओ पाहायला लागले त्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळाल्या. माझ्या टीमकडून मला सगळं कळालं. मी एकच विनंती करते आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये घालू नका. आम्ही फक्त कला सादर करतो. असही गौतमी पाटिलने सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.