LOKSANDESH NEWS
मंदिरात अडकलेल्या तीन साधूंची सुखरूप सुटका
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी तीन साधू हे पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी हे साधू पोहोचले होते. त्या मंदिराला पाण्याने वेढा दिल्याने हे साधू पुरात अडकून पडले होते.
सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम या साधूंना वाचवण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी रवाना झाली होती. हे साधू गेल्या काही तासांपासून पुराच्या पाण्यात अडकून पडले होते, आता त्या साधूंची रेस्क्यू कडून सुटका करण्यात आली आहे.