माती परीक्षण करण्याकडे वाढला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल
पीक पेरणीच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षणामुळे शेतकरी पीक प्रकाराची निवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतो आणि होणारे नुकसान टाळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करण्यासंदर्भात कृषी विभागाकडून नियमित जनजागृती केली जाते. याच माती परीक्षणासाठी बुलढाणा जिल्ह्यात आता शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय.
गेल्या वर्षांमध्ये विविध योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 हजार 500 शेतकऱ्यांनी माती परीक्षण केले आहे. तर 480 शेतकऱ्यांनी वैयक्तिक माती परीक्षण करून घेतले आहे. कृषी विभागाच्या जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी कार्यालय अंतर्गत विविध योजनेअंतर्गत 35 रुपये ते 275 रुपये शुल्क आकारून माती परीक्षण केले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माती परीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.