LOKSANDESH NEWS
पुण्यात पावसाला सुरुवात; उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडाफार दिलासा
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. उन्हाने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. आता अचानक सुरू झालेल्या पावसाने थोडाफार दिलासा मिळाला आहे. रविवारी हवामान विभागाकडून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
त्यानुसार बऱ्याच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. पुण्यातही मंगळवार नंतर यलो अलर्ट देण्यात आला होता. पुण्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासुन पुण्याच्या बऱ्याच भागात पावसाला सुरुवात झाली आहे. कात्रज, कोंढवा, हडपसर, धायरी, मध्यवर्ती भागात पेठांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली